नाशिक (प्रतिनिधी): संजय धामणे याचा इगतपुरी येथे झालेल्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व इगतपुरी पोलिसांनी एकत्र येऊन सापळा रचला व चौघा संशयित आरोपींना पकडले. यातील अजून संशयित हे फरार आहेत. नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी एकाला फलाटावरून पकडले व बेड्या ठोकल्या.
देवळालीगाव, नाशिकरोड येथील कुविख्यात गुंडाचा भाऊ संजय धामणे याचा इगतपुरी मध्ये (दि.१८) रोजी रात्री जुन्या वादातून धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वप्रथम आशा पॅट्रिक मॅक्वेल नावाच्या महिलेला अटक केली आहे. त्यातील एक संशयित रेल्वेने लखनऊला आपल्या गावी पळ काढण्याच्या तयारीत असण्याची गोपनीय माहिती इगतपुरी गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यांनी ती माहिती नाशिकरोड रेल्वे पोलिसांना दिली. त्यांनतर सूत्र हलवून संशयित गुन्हेगाराला ताब्यात घेतले.