नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घालून जनजीवन विस्कळीत केले आहे. मात्र, आशेचा किरण म्हणून, १४ जानेवारीपासून मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत संपूर्ण देशात लसीकरण मोहीम हाती घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण, केंद्राकडून सांगण्यात आले आहे कि, जर लसींना मंजुरी मिळाली तर, अवघ्या १० दिवसांच्या आताच लसीकरण सुरु होईल.
३ जानेवारीला देशात औषधे महानियंत्रकांकडून कोविशील्ड व कोव्हॅक्सिन या लसींच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्याकडून सांगण्यात येत आहे कि, लसीकरणाची सगळी तयारी पूर्ण झाली आहे. तसेच सुरुवातीला लस मुंबई, चेन्नई, कोलकाता, कर्नाल येथील शासकीय वैद्यकीय पुरवठा डेपोत पाठवण्यात येतील. त्यानंतर, राज्याच्या राजधानीत पोहचवण्यात येईल व तेथून लस जिल्हा मुख्यालय, कम्युनिटी हेल्थ सेंटर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोचवण्यात येईल. मात्र, राजधानीतून लस पोहचवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असे देखील राजेश भूषण म्हणाले. तर, महाराष्ट्रामध्ये ४ हजार २०० लसीकरण केंद्र तयार झाले असून, पहिल्या टप्प्यात १२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत देण्यात येणार आहे. तसेच ही लस कोणाला आधी द्यावी हे ठरवण्यासाठी केंद्र सरकारने समिती बनवली आहे. त्यानुसार, ज्यांचे वय ५० पेक्ष्या कमी आहे व त्यांना कुठलाच गंभीर आजार नाही याची खात्री करण्यात येणार आहे. तर, ज्या लोकांना गंभीर आजार असतील किंवा ज्यांच्या जीवाला धोका आहे त्यांना लस दिली जाईल. तर, सीरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक या लस निर्मात्यांमधील संघर्ष आता संपुष्टात आला असून, या दोघांनी मिळून निवेदन जाहीर केले आहे कि, देशात लस पोहचवण्यासाठी एकत्र येऊन काम करू.