
श्रद्धा फाउंडेशन व रिफ्लेक्शन जिम यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि २२) नाशिक श्री २०२२ स्पर्धा !
नाशिक (प्रतिनिधी): शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाची समजली जाणारी “नाशिक श्री” २०२२ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाची ही ४७वी नाशिक श्री स्पर्धा असून गोदा श्रद्धा फाउंडेशन व रिफ्लेक्शन जिम यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा व राज्य शरीरसौष्ठव असोसिएशन यांच्या मान्यतेने सदर स्पर्धा पार पडत आहे.
रविवार दि. २२ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता श्रद्धा लॉन्स (हनुमान वाडी रोड) येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व विजेत्यांसाठी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व पनवेलचे माजी उपमहापौर विक्रांतदादा पाटील, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहर अध्यक्ष गिरीश पालवे हे उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य आयोजक सुरेश अण्णाजी पाटील, डॉ. अक्षय पाटील, राजेंद्र सातपूरकर व बॉडी बिल्डींग असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790