नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांसाठी तालुकास्तरावर होणारे शिबीर बंद करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेची वाहनचालक परवान्याची कामे रखडली होती. म्हणून, तालुक्याच्या ठिकाणी आता महिन्यातून दोनदा शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून, असे एकूण १५६ शिबीर घेतले जातील.
बऱ्याच महिन्यापासून, वाहन परवाना संदर्भातील कामे थांबली होती. त्यामुळे शिबीर दरम्यान होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन, महिन्यातून दोनदा शिबीर घेतले जाणार आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली. तसेच शिबीर दरम्यान, नागरिकांनी आपले अनुज्ञप्तीची कामे करून घ्यावीत असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात पिपंळगावला, सिन्नर, येवला व निफाडला शिबीर आयोजित करण्यात येईल. तर, दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात घोटी, लासलगाव, दिंडोरीत व चौथ्या आठवड्यात चांदवड, त्र्यंबकेश्वर, सुरगाण्यात शिबीरे आयोजित करण्यात येणार आहेत.