वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिला आलेल्या मावस सासूवर जावयाचा बलात्कार
नाशिक (प्रतिनिधी): वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिकला आलेल्या मावस सासूवर जावयाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने अमरावती येथील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानुसार मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग झाला आहे.
संशयित नितीन आशू वाणी (वय ३५, रा. भारतनगर, नाशिक, मूळ रा. रिसोड, जि. वाशीम) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वडिलांच्या अंत्यविधीसाठी मावस सासू अमरावतीहून नाशिकला आली होती. साडीचोळी करण्यासाठी संशयित नितीन वाणी मावस सासूला २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारतनगरमधील घरी घेऊन आला. त्याने मध्यरात्री २. ३० वाजेदरम्यान झोपेत सासूचा गळा दाबला. त्यातून जागे झालेल्या सासूला त्याने विषाची बाटली दाखवून बलात्कार केला.
यावेळी त्याने सासूचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर त्याने १ ऑक्टोबर २०२१ रोजी नाशिकमधील एका हॉटेलमध्ये अश्लील फोटो दाखवून सासूवर बलात्कार केला. पीडित सासू अमरावती परतली. तो अमरावती येथील सासूच्या घरी आला. घरात सासू एकटी असताना त्याने पुन्हा अश्लील फोटो व विषाची बाटली दाखवून बलात्कार केला. जावयाचा त्रास असहाय्य झाल्याने पीडित सासूने ७ डिसेंबर २०२१ रोजी अमरावतीमधील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात येत आपबिती सांगितली. त्यानुसर पोलिसांनी संशयित नितीन वाणीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
बलात्काराच्या घटनेस नाशिकमध्ये सुरुवात झाल्याने पोलिसांनी पुढील तपासासाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: तोंड धुऊन येतो म्हणे आणि हाताला झटका देऊन अटकेत असलेला संशयित आरोपी फरार !
अबब: नाशिक शहर पोलिसांनी या जुगाऱ्यांकडून जप्त केला इतक्या लाख रुपयांचा मुद्देमाल!