वडाळ्यातील गुन्हेगाराचा वैतरणानजीक खून; मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, १ संशयित अटकेत

वडाळ्यातील गुन्हेगाराचा वैतरणानजीक खून; मृतदेह जाळण्याचा प्रयत्न, १ संशयित अटकेत

नाशिक (प्रतिनिधी): इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या व घोटी पोलिसांना यश आले.

नाशकातील वडाळा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुजाहिद अमजद खान ऊर्फ गोल्डन गोल्डी असे मृताचे नाव आहे. इंदिरानगर पोलिसांनी त्याला दोन वर्ष तडीपार केले होते.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत झाले 'इतके' टक्के मतदान…

या घटनेतील एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस तपास करीत आहे.

राजाराम खातळे यांच्या शेतानजीक मंगळवारी सकाळी ६ वाजता अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10577,10573,10570″]

मयत मुजाहिद (२३) याच्याविरोधात नाशिक, इंदिरानगर, अंबड पोलिस ठाण्यांत विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी स्वरूपाच्या टोळीतील आपापसातील वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत व संशयितांनी प्रथम मुंबई व नंतर नाशिक येथे एकत्रित मद्य प्राशन केले. नंतर मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा केल्यानंतर चारचाकी वाहनातून वैतरणा धरण परिसरात प्लॅस्टिक गोणीत टाकून जाळण्यात आल्याची माहिती संशयिताने दिली. इतर संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

लवकरच सर्व गुन्हेगार पकडण्यात येतील, असे ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, विभागीय अधिकारी कल्पना फडतारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल धुमसे, हवालदार शीतल गायकवाड, संतोष दोंदे, पंकज दराडे, हेमंत तुपलोंढे, बिपीन जगताप यांनी हा तपास केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह तरुणाच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आला

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790