नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या संकटकाळात केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोफत धान्य योजनेची मुदत नोव्हेंबर महिण्यात संपुष्टात आली आहे. तर वाढीव मुदतही डिसेंबर महिन्यात संपल्याने रेशनवर तूर डाळ मिळणे बंद झाले आहे. मोफत धान्य योजनेचा जिल्ह्यातील सात लाखांपेक्षा अधिक कार्डधारकांना लाभ झाला होता. आता ही योजनाच बंद झाल्याने कार्डधारकांना केवळ नियमित गहू,तांदूळ मिळणार आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत गरीब कुटुंबांना पाच किलो गहू, तांदूळ तसेच एक किलो डाळ दिली जात होती. या योजनेत चणा आणि तूर डाळ देण्यात आली. वास्तविक पाहता केवळ चणा डाळ देण्याची घोषणाच सरकारने केली होती. परंतु त्यानंतर तूर डाळ वाटपाला प्राधान्य देण्यात. आले. योजना सुरू असतानाच्या कालावधीतदेखील डाळ वाटपाबाबतची अनियमितता निर्माण झाली होती. काही ठिकाणी डाळ पोहोचली तर काही भागात डाळ उपलब्धच झालीच नाही.