नाशिक (प्रतिनिधी): चंदनाचे झाडे चोरी करणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे पथकाने ही कारवाई केली. विजय लक्ष्मण मुर्गे, भागचंदद राधाकृष्ण तांदळे (दोघे रा. नेवासा ) असे या संशयितचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर व परिसरात चंदन झाडे चोरी करण्याचे गुन्हे वाढले आहेत.
🔎 हे वाचलं का?: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटींमध्ये शासनाकडून शिथिलता!
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाला माहिती मिळाली. नेवासा येथे जाऊन दोघांस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार (एमएच १७ एजे ४८२२) आणि चंदनाचे तुकडे असा ५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे, वसंत खतेले, शामराव भोसले, शंकर काळे, बाळू शेळके आदींच्या पथकाने उपआयुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
![]()
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790


