नाशिक (प्रतिनिधी) : वडाळा येथील अशोका मेडीकवर हॉस्पिटलने कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी तब्बल तीन लाख दहा हजर रुपयांचे बिल आकारले. याप्रकाराणाविरोधात नागरिकांकडून तक्रारी येत असल्याने महापालिकेने सदर बिल अमान्य करत एक लाख २५ हजर रुपये अतिरिक्त असल्याचा निष्कर्ष काढत सात दिवसांच्या आत रुग्णाला अतिरीक्त पैसे परत करण्याची नोटीस बजावली आहे.
नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये लवकर बेड उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा पर्याय निवडावा लागतोय. परंतु हा पर्याय निवडणं त्यांना चांगलच महागात पडतंय. खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधीताच्या उपचारासाठी लाखो रुपयांच्या बिलांचा तगादा लावला जात आहे. याविरोधात शहरात तीव्र नाराजीही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेकडून यावर ठोस पावले उचलली जात आहे.