नाशिक (प्रतिनिधी): रविवार कारंजा येथील यशवंत मंडई भागातील नॅशनल युको बँकेच्या पाठीमागील भिंतीला चोरट्यांनी भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची सोमवारी (दि.१०) उघडकीस आले.
युको बॅँकेच्या पाठीमागील भींतीला अज्ञात चोरट्यांनी भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश करत करण्याचा प्रयत्न सोमवारी (दि.१०) पहाटे उघडकीस आला. चोरट्यांच्या हाती रोकड लागली नसली तरी चोरट्यांनी सीसीटीव्हीचे नुकसान करत बॅँकेतील संगणक लंपास करत पळ काढला असे प्राथमिक तपासात पोलिसांनी कारण सांगितले. सोमवारी सकाळी युको बँकेचे शटर कर्मचार्यांनी उघडले असता बँकेतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून दिसले. पाठीमागील भिंतीला भगदाडदेखील आढळून आले.
शटर जेव्हा कर्मचाऱ्यांनी सकाळी उघडले असता तेव्हा बॅँकेतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले आढळून आले. यामुळे बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त अमोल तांबे, सहायक आयुक्त मंगलसिंह सुर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक हेमंत सोमवंशी यांच्यासह श्वान पथक, गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांनी बॅँकेत प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे नुकसान केल्याचे आढळले. दोन दिवसांपासून बॅँकांना सुटी होती; त्यामुळे हा प्रकार सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी हा सगळा लुटीचा प्रकार शनिवारी मध्यरात्री केला की रविवारी याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान चोरट्यांनी नेमकी किती रक्कम लांबविली याची मोजनी बँक यंत्रणा पोलिसांकडून सुरू होती. पुढील तपासात याबद्दलचा सविस्तर तपशील मिळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.
फोटो: मंगेश सोनवणे