आडगाव – म्हसरुळ लिंक रोडवरील हॉटेल कॅटल हाऊसमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर म्हसरूळ पोलिसांनी छापा टाकून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले.
याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ संजय देशमुख (३२, रा. हॉटेल कॅटल हाऊस, देशमुख वस्ती, म्हसरूळ- आडगाव लिंक रोड), सुरेंद्र प्रेमसिंग धामी (२९, रा. व्यवस्थापक, हॉटेल कॅटल हाऊस), अशी दोघा संशयितांची नावे आहेत.
पोलिस अंमलदार पंकज चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, हॉटेल कॅटल हाऊस या ठिकाणी अवैधरीत्या हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर पोलिसांनी मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी (ता. १५) रात्री सापळा रचला होता. प्रतिबंधित सुगंधित हुक्का पार्लर सुरू असल्याची खात्री पटताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
या वेळी पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व हुक्का पिण्याचे साहित्य असे १८ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.