मॉर्निंग वॉकला जाताना अपघात; पुत्रासमोर पिता ठार
नाशिक (प्रतिनिधी): येथील जयभवानी रस्त्यावर पहाटे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी चाललेल्या पिता-पुत्रांना भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने धडक दिली. यावेळी पित्याच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. उपनगर पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेली माहिती व जतिन विकास भिरुड (२०) यांच्या फिर्यादीनुसार विकास नथू भिरुड व त्यांचा मुलगा जतिन हे नेहमीप्रमाणे जयभवानीरोडने उपनगर नाक्यापर्यंत मॉर्निंग वॉकसाठी बुधवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास निघाले असता निसर्ग उपचार केंद्रासमोरून जाताना उपनगरकडून आलेल्या सफेद कारने (एमएच १५ इइ ०९०६) धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. अपघातात विकास भिरुड यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
आसाराम बापू आश्रमात काम करणाऱ्याचे अपहरण झाल्याची तक्रार.. धक्कादायक सत्य उघडकीस..
नाशिकरोडला प्रवाशाला लुटणारा ‘तो’ रिक्षाचालक व त्याचा साथीदार अटकेत..रिक्षाही जप्त..
नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू