आजच्या डिजिटल युगात, ऑनलाइन बिजनेसचे महत्व अतिशय निर्णायक आहे. दररोज हजाराहून अधिक वेबसाइट्स तयार होतात. परंतु, वेबसाइट्स ऑनलाईन दिसण्यासाठी वेब होस्टिंग सेवा हि आवश्यक असते.
२०१२ मध्ये स्थापीत, माइल्सवेब हि नाशिक मधील एक उत्कृष्ट आणि विश्वसनीय ग्लोबल वेब होस्टिंग कंपनी आहे. आज हि कंपनी जगभरातील लहान, मोठे व एंटरप्राइझ-स्तरीय व्यवसायांचे ऑनलाइन स्वप्न यशसवीरीत्या पूर्ण करते.
माइल्सवेबने कालांतराने होस्टिंग उद्योगात एक मजबूत उपस्थिती निर्माण केली. उच्च-गुणवत्तेच्या आणि वैशिष्ट्यांनी युक्त वेब होस्टिंग सेवा योग्य किमतीत ऑफर करण्यासाठी माइल्सवेब आज लोकप्रिय आहे. वेब होस्टिंग बरोबर रीसेलर, व्हीपीस, डेडिकेटेड होस्टिंग, क्लाऊड, डोमेन, एसएसल, इमेल्स आणि इतर सर्विसेस माइल्सवेब प्रदान करते.
या कंपनीचा उंच यशप्राप्ती चा प्रवास अविस्मरणीय आहे, असे म्हणायला हरकत नाही!
मुख्य म्हणजे, कंपनीची प्रमुख सुरवात तीन तरुण उद्योजक, चिन्मय डिंगोरे, चेतन महाले आणि दिपक कोरी यांनी केली. या आधारस्तंभांपैकी प्रत्येकाकडे होस्टिंग क्षेत्रात भरभरून अनुभव आहे. चिन्मय म्हणजेच, तांत्रिकदृष्ट्या निपुण! ते माइल्सवेबचे सर्व्हर व्यवस्थापन आणि तांत्रिक ऑपरेशन्स हाताळतात व ते कंपनीचे एक महत्वपूर्ण पैलू आहेत.
दुसरे म्हणजे, चेतन महाले, जे व्ययसाय वाढवण्यासाठी धोरणात्मक योजना अंमलात आणतात. कंपनीने ब्रँड-बिल्डिंग आणि महसूल मिळवण्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर त्यांनी पाऊल टाकले आहे.
दिपक हे एक गतिमान आणि अष्टपैलू व्यावसायिक आहेत. त्यांचा कंपनीच्या वाढीच्या प्रत्येक पैलूचे व्यवस्थापन करण्यात अमूल्य वाटा आहे, मग ते उत्कृष्ट विपणन रणनीती असो, वेब होस्टिंग ऑपरेशन्स असो किंवा माइल्सवेब साठी सर्वोत्तम उत्क्रांती धोरणांचे नेतृत्व करणे असो.
त्यांचे प्रचंड योगदान आणि कौशल्य हे आज कंपनीने केलेल्या प्रभावी वाढीसाठी बेंचमार्क आहेत! आजपर्यंत, कंपनीने जगभरात ४०,००० पेक्षा जास्त ग्राहक मिळवले आणि १ दशलक्ष पेक्षा जास्त वेबसाइट होस्ट केल्या आहेत.
त्यांच्या सेवेचे तीन मजबूत स्तंभ म्हणजेच, २४/७ ग्राहक समर्थन, ९९.९५% अपटाइम आणि ३०-दिवसांची मनी-बॅक हमी! खात्री बाळगा, माइल्सवेब सोबत तुमची वेबसाईट फास्ट आणि सुरक्षित असेल.
दोन शब्द माइल्सवेबच्या ग्लोबल डेटा सेंटर बाबत:
माइल्सवेबचे डेटा सेंटर भारत, यूएसए, यूके, कॅनडा, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया येथे आहेत. मजबूत आयटी पायाभूत सुविधांसह टियर-3 आणि टियर-4 डेटा सेंटर्स जागतिक-विस्तृत आहेत. आणि हेच, वेबसाइट्सला सर्वोच्च अपटाइम वितरीत करतात.
त्याचप्रमाणे, डेटा सेंटरवरील सर्व सर्व्हर अल्ट्रा-फास्ट कनेक्टिव्हिटीसह, प्रगत हार्डवेअर आणि उच्च दर्जाची सुरक्षा अनुसरण करतात. एकंदरीत, माइल्सवेब ग्राहकांसाठी प्रत्येक पाउल पुढे टाकण्यात तज्ज्ञ आहे.
पुरस्कृत वेब होस्टिंग कंपनी!:
अनेक कंपन्या कौशल्य प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात, आणि माइल्सवेब त्यामधून एक आहे. ग्राहक समाधान, उत्कृष्ट वेब होस्टिंग आणि अनेक पैलूंसाठी माइल्सवेब पुरस्कार विजेते ठरले आहेत.
जसे कि “एनेबलर ऑफ द इयर अवॉर्ड” नया भारत-जागरण ग्रुप कडून, जे भारतातील आघाडीचे मीडिया ग्रुप आहेत. त्याचबरोबर, HostAdvice द्वारे “२०२२ यूसर्स टॉप चॉइस अवॉर्ड”, “उत्कृष्ट सेवा पुरस्कार”आणि अधिक.
आणखी एक गोष्ट म्हणजे, फोर्ब्स अॅडव्हायझर, इकॉनॉमिक टाईम्स, नाशिक टाइम्स आणि यासारख्या मोठ्या मीडिया हाऊसमध्ये माइल्सवेबचा उल्लेख केला गेला आहे.
ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनी सर्वोत्तम पद्धतीचे अनुसरण करते! म्हणूनच आज माइल्सवेब ला विश्वसनीय प्लॅटफॉर्मवर १२,०००+ आनंदी अभिप्राय मिळाले आहेत.
संघ हा कंपनीचा कणा आहे:
माइल्सवेब ची टीम दिवसेंदिवस आगेकूच घेत आहे. आज त्यांच्याकडे ८० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची टीम आहे. अतिशय सकारात्मक आणि वेगवान कामाचे वातावरण येथे जोपासले जाते.
कंपनीमध्ये अनेक विभाग आहेत, जसे बिलिंग, सीआरएम, टेकनिकल सपोर्ट, डिजिटल मार्केटिंग आणि HR.अखेरीस, माइल्सवेब हे कर्मचाऱ्यांच्या करिअरला चालना देण्यासाठी एक आनंदी ठिकाण आहे, जेथे सर्व कार्यस्थळ नैतिकता आणि मूल्यांचा सन्मान केला जातो.
इतर प्रत्येक वेब होस्टिंग कंपनी प्रमाणे होस्टिंग आणि क्लाऊड बाजारात जास्तीत जास्त प्रगती करावी, असे माइल्सवेबचे उद्दिष्ट आहे.
असे असले तरी, कंपनीचे ध्येय हे जास्तीत जास्त व्यवसाय ऑनलाइन होण्यास मदत व्हावी आणि ग्राहकांचे समाधान हेच सर्वोच्च प्राधान्य! अधिक माहितीसाठी भेट द्या: www.milesweb.in