नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होऊ लागली आहे. कुठे बेड्स नाहीत तर कुठे ऑक्सिजन नाही. तर कुठे बेड्स आहेत पण ऑक्सिजन नाही. या गंभीर परिस्थितीत रुग्णांना कुठल्या हॉस्पिटलला बेड्स उपलब्ध आहेत याची माहिती व्हावी, यासाठी नाशिक महापालिकेने सीबीआरएस सिस्टीम उपलब्ध करून दिली. मात्र ही सिस्टीमच सातत्याने अपडेटेड नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, नाशिक महापालिकेने काही हेल्पलाईन नंबर्स आणि सीबीआरएस सिस्टीम (http://covidcbrs.nmc.gov.in) सुरु केली. या माध्यमातून गरजू रुग्णांना आवश्यक असणारा बेड रुग्णालयात मिळू शकेल असे अपेक्षित आहे. मात्र या सिस्टिमचे नाशिक कॉलिंगने रिअलिटी चेक केले असता, सिस्टीमच अपडेट नसल्याचे आढळून आले.
सीबीआरएसच्या वेबसाईटवर जर बेड्सची उपलब्धता तपासली तर अनेक हॉस्पिटल्स मध्ये बेड्स, ऑक्सिजन बेड्स उपलब्ध असल्याचे दिसते. हॉस्पिटल्सच्या नावावर क्लिक केल्यावर हॉस्पिटलचा पत्ता आणि त्यांचा नंबर दिसतो. आणि इथून सुरु होता मनस्तापाचा खेळ… एकतर या हॉस्पिटल्सचे नंबर्स लागत नाहीत आणि लागले तर बेड्स उपलब्ध नाहीत असे उत्तर येते. “मग सीबीआरएस सिस्टीम वर बेड्स कसे उपलब्ध दाखवताय” असा प्रश्न विचारला तर “माहित नाही, इथे येऊन बघा, अपडेट नसेल” अशी उत्तरं समोरून येताय..
नाशिक महापालिकेने दिलेल्या हेल्पलाईन नंबर्सची सुद्धा हीच अवस्था आहे… नाशिक महापालिकेने दिलेल्या हेल्पलाईन नंबर्सवर फोन करून बेड्सची उपलब्धता विचारली असता त्या त्या भागातील हॉस्पिटल्सचे नंबर्स दिले जातात आणि त्या नंबर्सवर फोन केला असता पुन्हा सुरु होतो तोच खेळ…
विशेष म्हणजे अनेक हॉस्पिटल्सचे नंबर्स बंद लागताय.. आपण महापालिकेला सीबीआरएस सिस्टीमवर टाकण्यासाठी दिलेले नंबर्स चालू ठेवणं हि जितकी एखाद्या हॉस्पिटलची जबाबदारी आहे तितकीच हॉस्पिटल्सने संपर्कासाठी दिलेले नंबर्स त्यांनी चालू ठेवावे हे निर्देश देणं ही महापालिकेची सुद्धा जबाबदारी आहे.. अन्यथा पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक जाणार कुठे ? त्यामुळे आता हॉस्पिटल्स आपल्याकडील बेड्सची उपलब्धता या सिस्टीमवर अपडेट करत नाही कि त्यांनी करून सुद्धा सिस्टीम अपडेट होत नाही याची महापालिकेने चौकशी करावी अशी मागणी नाशिककर करत आहेत…