
महत्वाची बातमी: रथोत्सवामुळे वाहतूक मार्गात बदल
नाशिक (प्रतिनिधी): रथ मिरवणुकीसाठी मंगळवारी (दि. १२) पंचवटीमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आहे.
काळाराम मंदिर पूर्व दरवाजा, गौरी पटांगण, गाडगे महाराज पटांगण, साईबाबा मंदिर, रामकुंड, अंबिका चौक, शनि चौक, काळाराम मंदिर उत्तर दरवाजापासून नाग चौक, काट्या मारुती पोलिस चौकी, देवी मंदिर, गणेशवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय, गौरी पटांगण, रोकडोबा मारुती मंदिर, गाडगे महाराज पुलाखालून नेहरू चौक, मालवीय चौक, शनी चौक, काळाराम मंदिर चौक असा रथाचा मार्ग आहे.
या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असा राहील: काट्या मारुती चौकाकडून गणेशवाडीमार्गे मेनरोडकडे जाणारी वाहने काट्या मारुती चौक, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजामार्गे इतरत्र जातील. काट्या मारुती चौक, संतोष टी पॉइंट, द्वारका सर्कलमार्गे इतरत्र जातील व येतील.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिकच्या डॉक्टरची सिन्नरमध्ये आत्महत्या; सलाइन लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
नाशिक शहर: युवतीस पळवून नेल्याच्या रागातून नातेवाईकांची मारहाण, तरुणाचा मृत्यू
नाशिक: पोलिस कर्मचाऱ्याचा पत्नीसह कुटुंबावर जिवघेणा हल्ला; सासऱ्याचा मृत्यू