महत्वाची बातमी: नाशिक शहरातील या भागांत शनिवारी (दि ५ मार्च) पाणीपुरवठा विस्कळीत होणार
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत महापालिकेने महत्वाची सूचना दिली आहे.
नाशिक शहरातील काही भागात शनिवारी (दि. ५ मार्च २०२२) पाणीपुरवठा अंशत: विस्कळीत असणार आहे.
तर रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
मनपाचे मुकणे धरण पंपिंग जॅकवेलचा ३३ के.व्ही. वीजपुरवठा २२० के.व्ही.रेमण्ड सबस्टेशन येथून शनिवार दि.०५/०३/२०२२ रोजी फिडरवरील दुरुस्ती करावयाची आहे.
त्यामळे महावितरण कडून दुपारी १२.०० ते २.०० या वीजपुरवठा कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे, तरी बंद दरम्यान कालावधीत विल्होळी जल शुध्दीकरण केंद्रावरुन नाशिक शहरात संबंधित भागास होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे मनपाचे विल्होळी जलशुध्दीकरण केंद्र (मुकणे प्रकल्प) येथुन होणारा पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. यास्तव शनिवार दिनांक ०५/०३/२०२२ रोजी नविन नाशिक मधील प्रभाग क्र.२४,२५,२६,२७,२९ व २२ भागश: व २८ व ३१ या संपुर्ण प्रभागांचा तसेच नाशिक पुर्व मधील प्रभाग क्र.१४,१५,२३,३० भागश: या प्रभागामंध्ये (सकाळ व सायंकाळचा ) पाणी पुरवठा अंशत: विस्कळीत हाईल. तसेच रविवार दिनांक ०६/०३/२०२२ रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने होईल तरी सदर भागातील नागरीकांनी याची नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती असे सांगण्यात आले आहे.
किराणा दुकानाला लागलेल्या आगीत आई आणि मुलगा भाजले..; दुकान जाळून खाक
हृदयद्रावक: केळवे समुद्र किनाऱ्यावर नाशिकच्या तीन मुलांसह एकाचा पाण्यात बुडून मृत्यू