भारतीय सैन्यात असल्याचे भासवून नाशिकच्या गोशाळेला तब्बल १ लाखाचा चुना !

नाशिक (प्रतिनिधी) : देवळाली कॅम्प येथील भारतीय सैन्यदलाच्या तळाकडून १० हजार गोवऱ्यांची मागणी असून, सेना प्रशासनाच्या अटीनुसार अनामत रक्कम भारावीच लागेल. असे सांगत चोरट्यांनी गोशाळेच्या संचालकाची १ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.     

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुची सिंघानिया (रा.काळाराम मंदिर) या नंदिनी गोशाळेच्या व्यवस्थापक आहेत. बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) रोजी दुपारी संशयित आरोपी साहिल कुमार व मंजीत सिंग यांनी बनाव करत, गोशाळेचे महेंद्र पोतदार यांच्याशी संपर्क साधला. साहिलने आपले वरिष्ठ अधिकारी मंजीत सिंग असल्याचे सांगत, लष्करात असल्याचे भासवले. या बोलणी दरम्यान भामट्यांनी १० हजार गोवऱ्यांचा व्यवहार निश्चित केला. यावेळी व्यवस्थापक सिंघानिया यांनी ऍडव्हान्स रक्क्म मागितली असता, संशयितांनी गुगलपे अकाऊंटची माहिती मागवली. दरम्यान आम्ही लष्करात आहोत. तरी तुम्ही प्रथम ५ रुपये आमच्या खात्यात पाठवा. सिंघानिया यांनी पैसे पाठवले असता, परत त्यांच्या खात्यावर संशयितांनी ४५ रुपये पाठवले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

अशा प्रकारे विश्वासात घेत संबंधितांनी तांत्रिक अडचण असून, सिंघानिया यांना ४९ हजार रक्कम पाठवण्यास सांगून, तुमचे पैसे परत करतो अशी खात्री दिली. सिंघानिया यांनी पैसे पाठवले असता, त्यांच्या खात्यातून काही तासातच ९४ हजार ९९८ रुपये काढण्यात आले. नंतर सिंघानिया यांनी संशयितांना संपर्क केला असता. मोबाईल बंद आढळला. चोरटयांनी गोवऱ्या तर घेतल्या नाहीच शिवाय, अनामत रक्कम देखील फसवणूक करून गंडवली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here