नाशिक (प्रतिनिधी): व्यवसायामध्ये तोटा झाला म्हणून भागीदाराने पैशांसाठी तगादा लावत धमकी दिल्याने व त्रासाला कंटाळून (दि.२६ डिसेंबर)ला एका व्यक्तीने आत्महत्या केल्याने जगदीश चौधरी यांनी चार जणांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, आत्महत्या केलेली व्यक्ती नरसीराम चौधरी यांना त्यांचे भागीदार आशिष शहा, हरीश शहा,शिरीष,मोहन जोशी यांच्या सोबत करत असणाऱ्या व्यवसायात तोटा झाला म्हणून भागीदार हे नरसीराम यांच्या कडून ५२ लाख रुपये घेण्यासाठी मागे लागले होते. पैसे नाही दिले तर त्याचे राहते घर नावावर करून घेऊन गावाकडे राहत असलेल्या आईवडिलांना उचलून आणू व गावाकडील जमीन देखील नावावर करून घेऊ अशी धमकी मिळाल्याने नरसीराम चौधरी यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.