बापरे: नाशिकच्या ‘ह्या’ तालुक्यात थंडीचा कहर; इतकं होतं तापमान
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या ह्या तालुक्यातील तापमान इतकं कमी झालं आहे की तुम्हालासुद्धा हुडहुडी भरेल..
राज्यातील महाबळेश्वरपेक्षाही निफाड तालुक्याच्या तापमानात कमालीची घट झाल्याने तालुका चांगलाच गारठला आहे.
उत्तरेकडील शीतलहरींचा शिरकाव झाला असून किमान तापमानाचा पारा वेगाने घसरत आहे.
बुधवारी कुंदेवादी येथील गहू संशोधन केंद्रात ८.४ अंश तापमानाची नोंद झाली. वाढत्या थंडीच्या कडाक्याने तालुका चांगलाच गारठला आहे.
मागील महिन्यांत हवामान बदलामुळे अचानकपणे झालेल्या अवकाळी पावसाने किमान तापमानाचा पारा खाली आला होता. त्यानंतर पुन्हा थंडी शहरातून गायब झाली. मात्र राज्यात सर्वत्र शीतलहरींचा प्रभाव गेल्या चार दिवसांपासून पाहावयास मिळू लागला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांपर्यंत किमान तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निफाड तालुक्यात दि २१ रोजी ९.५ अंश चे तापमान होते त्यात आज घसरण होत तापमान ८.४ वर आले आहे. या एका दिवसांमध्ये एक अंशांनी तालुक्याचे तापमान कमी झाले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
धक्कादायक: वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिकला आलेल्या मावस सासूवर जावयाचा बलात्कार
नाशिकला दुर्दैवी घटना; पुरस्कार घेण्यासाठी जाणाऱ्या नाट्यकलावंताचा अपघाती मृत्यू
नाशिक: तोंड धुऊन येतो म्हणे आणि हाताला झटका देऊन अटकेत असलेला संशयित आरोपी फरार !