पुन्हा अग्नितांडव, गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला, रॉकेटसारखे उडाले सिलेंडर्स.. Video

पुन्हा अग्नितांडव, गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक उलटला, रॉकेटसारखे उडाले सिलेंडर्स.. Video

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात खासगी बस पेटल्याने तब्बल १२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, सप्तशृंग गडावर एसटी बस पेटली या दोन घटना घडल्यानंतर आता मनमाड परिसर हादरला आहे.

आज सकाळपासून अपघाताच्या मालिकेने नाशिक शहरासह जिल्हा हादरला आहे.

औरंगाबाद रोड त्यानंतर सप्तशृंगी गड आणि आता मनमाडनजीक गॅस सिलेंडर घेऊन जाणारा ट्रकला आग लागून भयंकर स्फोट झाला आहे.

स्फोट इतका भीषण होता कि, ट्रकमधील सिलेंडर हवेत रॉकेटसारखे फेकले गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”11627,11634,11624″]

नाशिकमध्ये आज सकाळी औरंगाबादरोडवर असलेल्या मिरची हॉटेलजवळ भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातात बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यानंतर सप्तशृंगी गडावर एसटी महामंडळाच्या बसला भीषण आग लागल्याची घटना घडली.

त्यानंतर आता गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना मनमाडनजीक घडली आहे. पुणे -इंदूर महामार्गांवर झालेल्या या अपघातात सिलिंडर्स रॉकेटसारखे हवेत उडत होते. सिलेंडरचे स्फोट होत असल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे किलोमीटर अंतरावर रोखून ठेवण्यात आली होती. त्यामुळे पुणे-इंदूर महारमार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.

मनमाड पासून जवळ पुणे -इंदौर महामार्गांवर गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक पलटी होऊन त्यात आग लागल्याची घटना घडली. दरम्यान ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे आगीची तीव्रता वाढली. तसेच वेळीच घटना लक्षात आल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक 2 किमी लांब रोखून धरण्यात आली आहे. ट्रक मध्ये गॅसने भरलेले सुमारे 200 सिलेंडर असल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले मात्र सिलेंडरचे स्फ़ोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचण येत आहे. अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790