शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश
नाशिक (प्रतिनिधी): निमाणी – उत्तमनगर सिटी बसचा शुभारंभ गुरुवारी, ७ ऑक्टोबर रोजी झाला. गोविंदनगर, कर्मयोगीनगरसह ठिकठिकाणी या बससेवेचे रहिवाशांनी उत्साहात स्वागत केले. शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनच्या प्रयत्नांना यश आले आहे.
निमाणी ते उत्तमनगर ही कर्मयोगीनगर, गोविंदनगर मार्गे बससेवा सुरू करावी, अशी मागणी सत्कार्य फाऊंडेशनचे अध्यक्ष, शिवसैनिक बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारूशिला गायकवाड (देशमुख) यांच्यासह रहिवाशांनी केली होती. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर गुरुवारी, ७ ऑक्टोबर रोजी नाशिक परिवहन महामंडळाने ही सेवा सुरू केली.
गोविंदनगर कोशिकोनगर, छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळा कर्मयोगीनगर, रुंग्ठा इम्पेरिया, कालिका पार्क, मनपसंद स्वीट चौक पाटीलनगर, महालक्ष्मी चौक सावतानगर, खांडे मळा, उत्तमनगर आदी ठिकाणी नागरिकांनी बसचे स्वागत केले. फुलांचा हार आणि फुगे लावून बस सजविण्यात आली होती. चालक, वाहकांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. महिलांनी बसचे पूजन केले. रुंग्ठा इम्पेरिया येथे पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळेजवळ स्वागतोत्सव झाला. बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नागरिकांनी शिवसेना, सत्कार्य फाऊंडेशनचे आभार मानले आहे. सकाळी ७ वाजेपासून रात्री साडेसात वाजेपर्यंत दर ४५ मिनिटांनी बस उपलब्ध होणार आहे.
निमाणी, सीबीएस, महामार्ग बसस्थानक मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा, गोविंदनगर, सदाशिवनगर, आर.डी.सर्कल, ऋषी हॉटेल, अशोकराव तिडके चौक, छत्रपती राजे संभाजी व्यायामशाळा, कालिका पार्क, मनपसंद स्वीट पाटीलनगर, महालक्ष्मी चौक सावतानगर, शांती चौक तोरणानगर, पंडितनगर, उत्तमनगर असा या बसचा मार्ग आहे. यावेळी बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशिला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, नाना पाटील, सुभाष गायधनी, नीलेश साळुंखे, संजय टकले, नितीन भुजबळ, प्रथमेश पाटकर, डॉ. प्रमोद महाजन, सुनिता उबाळे, ज्योती वडाळकर, उज्ज्वला सोनजे, वंदना पाटील, मीना टकले, नीलेश ठाकूर, यशवंत जाधव, नितीन तिडके, लक्ष्मण ढिकले, घनश्याम सोनवणे, प्रल्हाद भामरे, विनोद पोळ, संदीप वाजे, चंद्रकांत आहिरे, डॉ. राजाराम चोपडे, हेमंत तिडके, मनोज बागुल, कृष्णा सोनवणे, मनोज वाणी, मकरंद पुरेकर, बाळासाहेब राऊतराय, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, अशोक पाटील, प्रथमेश पाटील, संजय ओस्तवाल, संग्राम देशमुख, संकेत गायकवाड (देशमुख), हरिष काळे, मनोज सोनार, श्याम अमृतकर, बन्सीलाल पाटील, शीतल गवळी, कल्पना कदम, ऋषाली ठाकरे, आशालता काळे, शोभा चौधरी, स्मिता गाढवे, शीतल पवार, चंद्रकला वाघ, चंद्रकला ठाकरे, प्रतिभा वडगे, स्वाती वाणी, स्वाती गांगुर्डे, मोना देवरे, मानसी पुरेकर, मंदा पवार, वैशाली मराठे, पूनम शेणकर, संगिता डामरे, साधना म्हस्के, अलका पाटील आदींसह नागरिक हजर होते.