नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी रोडच्या कलानगर येथे तीन वर्षापूर्वी झालेल्या निखील मोरे खून प्रकरणी नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
सदरचा गुन्हा नाशिक पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील म्हसरुळ पोलीस ठाणेच्या हद्दीत दिनांक 17.08.2017 रोजी 22.00 वा.चे.सुमारास व्यंकटेश कृपा बिल्डींगचे खाली, कलानगर, दिंडोरीरोड, नाशिक येथे घडलेला आहे.
सदर गुन्हयातील फिर्यादी सुरज फकिरा खोडे रा. साई रेसीडेंन्सी, रिलायन्स पेट्रोलपंपा समोर, कलानगर, नाशिक हे त्यांचे मित्र अमोल निकम व निखिल मोरे असे गप्पा मारत उभे असतांना आरोपी क्रं. 1) आरिफ शेहेजाद कुरेशी रा.दिंडोरीरोड, म्हसरुळ नाशिक, 2) सागर उर्फ मोन्या आनंदा चंद्रमोरे रा. राजवाडा, म्हसरुळ नाशिक, 3) शरद दिपक पगारे रा. पेठरोड, पंचवटी नाशिक, 4) रोशन जयवंत पगारे रा. समृध्दी कॉलनी, आकाश पेट्रोलपंपामागे, दिंडोरीरोड, नाशिक, 5) अमर रंजीत गागुंर्डे रा. विरा सोसायटी, आकाश पेट्रोलपंपामागे, दिंडोरीरोड, नाशिक, 6) जॉन उर्फ सुनिल हरी काजळे राहरीकुटीर सोसायटी, आकाश पेट्रोलपंपामागे, दिंडोरीरोड, नाशिक, 7) चंग्या उर्फ सुजित भास्कर पगारे रा. स्नेहनगर, दिंडोरीरोड, पंचवटी नाशिक, 8) अंक्या उर्फ अंकुश नाना जाधव रा. गणेशनगर, दिंडोरीरोड, नाशिक अशांनी मागील भांडणाची कुरापत काढून संगनमत करुन गैरकायदयाची मंडळी जमवून लोखंडी कोयत्याने फिर्यादीचा मित्र निखील मोरे यांचेवर वार करुन ठार मारले व फिर्यादी व फिर्यादीचा मित्र अमोल निकम यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन आरोपींविरुद्ध म्हसरुळ पोलीस ठाणेत भादंवि कलम 302,307,326,143,147,148,149, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,4/25, 7/27, महाराश्ट्र पोलीस कायदा कलम 135, 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक, व्ही.डी.षार्दुल तत्कालीन नेमणूक म्हसरुळ पोलीस ठाणे नाशिक शहर, यांनी केलेला असून त्यांनी आरोपीविरूध्द् सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबीत होण्याचे दृष्टीने प्रयत्न चिकाटीने तपास केला व आरोपींविरूध्द् मा. जिल्हा न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 02, नाशिक येथे सुरू होती.
मंगळवारी दिनांक 10.11.2020 रोजी मा.श्री.एम.एस.बोधनकर,जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक 06,नाशिक यांनी सदर गुन्हयातील आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थिीतीजन्य पुराव्यास अनुसरून वरील 08 आरोपींपैकी आरोपी क्रं. 1) आरिफ शेहेजाद कुरेषी, 2) शरद दिपक पगारे , 3)रोशन जयवंत पगारे, 4) अमर रंजीत गागुंर्डे, 5) जॉन उर्फ सुनिल हरी काजळे आरोपीतांस सीआरपीसी कलम 235 (2)अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.