नाशिक: पत्नीने कानशिलात लगावल्याने पतीचा पत्नीवर चाकूने हल्ला, नंतर स्वत:वरही वार…
नाशिक (प्रतिनिधी): पतीच्या कानशिलात लगावल्याने पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केला.
यानंतर पतीने स्वतःवर सुद्धा वार केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे.
याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघं पती पत्नी दीपाली कुऱ्हाडे आणि बाळू कुऱ्हाडे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक माहिती अशी की, दीपाली कुऱ्हाडे वय 30 वर्ष आणि बाळू कुऱ्हाडे वय ३३ वर्ष, हे त्यांच्या मुलासोबत अहमदनगर जिह्यातील गोंदेगाव येथे राहतात.
- नाशिक: गाडीवरील ताबा सुटला अन युवतीसह गाडी थेट एटीएममध्ये… Video बघा…
- नाशिक: जिल्हा परिषदेच्या अभियंत्यास दीड लाख लाच घेताना अटक
काही दिवसांपूर्वी दीपाली कुऱ्हाडे त्यांच्या माहेरी नाशिक येथील चुंचाळे येथे आले होते.त्यांचे पती बाळू सुद्धा सोबत होते. गुरुवारी (दि.२) बाळू यांनी चेष्टामस्करीत चारचौघात आपल्या पत्नीच्या अंगावर हात ठेवल्याने ही घटना घडली. माहेरच्या लोकांसमोर पतीने अंगावर हात टाकल्याने पत्नीने मागचा पुढचा विचार न करता थेट आपल्या पतीच्या कानशिलेत वाजविली.
त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने पत्नीस शिवीगाळ व मारहाण करीत किचनमधील धारदार चाकूने हल्ला केला. यावेळी त्याने पत्नीच्या गळ्यावर व कानावर सपासप वार केले यानंतर त्याने स्वतःच्याही गळ्यावर चाकू मारून दुखापत करून घेतले. जखमी दाम्पत्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पती विरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.