
नाशिक: होलसेल किराणा दुकान फोडून पावणे पाच लाखांच्या गोडेतेलाच्या डब्यांची चोरी
नाशिक (प्रतिनिधी): होलसेल किराणा दुकानाच्या शटरचा कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने कापून दुकानात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने विविध कंपन्यांच्या गोडेतेलाच्या डब्यांसह साबूदाण्याचे कट्टे असा सुमारे पावणेपाच लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जितेंद्र मांगीलाल भंडारी (रा. बालाजी विहार, अशोकस्तंभ, नाशिक) यांचे पेठ रोडवरील शरदचंद्र मार्केट यार्ड गेटजवळ मर्चंट्स बँकेच्या बाजूला जे. एम. ट्रेडर्स या नावाचे होलसेल किराणा दुकान आहे.
या किराणा दुकानाच्या शटरचा कडीकोयंडा अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडून दुकानात प्रवेश केला.
यावेळी दुकानात असलेले २ लाख ३९ हजार २५० रुपये किमतीचे मुरली सोयाबीन कंपनीचे १५ किलो वजनाचे ८७ डबे, ६३ हजार रुपये किमतीचे सोयाबीन गोडेतेलाचे १५ लिटर वजनाचे २५ डबे, १७ हजार ७०० रुपये किमतीचे फॉर्च्युन सनफ्लॉवर गोडेतेलाचे १५ लिटरचे सहा डबे, २१ हजार ३५० रुपये किमतीचे जेमिनी सनफ्लॉवर गोडेतेलाचे १५ लिटर वजनाचे ७ डबे, २० हजार ४०० रुपये किमतीचे फॉर्च्युन गोडेतेलाच्या ५ लिटर वजनाच्या २० कॅन, २३ हजार ५२० रुपये किमतीचे मुरली सोयाबीन गोडेतेलाचे प्रत्येकी ५ लिटर वजनाच्या २८ कॅन, ५२ हजार ८०० रुपये किमतीचे मुरली सोयाबीन गोडेतेलाचे १ लिटर वजनाचे ३२० पॅकेट, असे एकूण ३२ बॉक्स, १५ हजार ६०० रुपये किमतीचे फॉर्च्युन गोडेतेलाचे एक लिटर वजनाचे ८० पॅकेट असलेले ८ बॉक्स, तसेच १२ हजार ९६० रुपये किमतीचे एम. एस. डबर हत्ती कंपनीचा साबूदाणा प्रत्येकी ३० किलो वजनाचे ८ कट्टे व १० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ४ लाख ७६ हजार ५८० रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला.
- नाशिक: अल्पवयीन मुलीला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी
- नाशिक: एका ‘कट’मुळे घडला मोठा अपघात, 4 मित्र जागीच ठार
दरम्यान ही घरफोडी दि. १० ते ११ मेच्या मध्यरात्री कधी तरी घडली असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहे.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790