नाशिक: हरिहर किल्ला, दुगारवाडी धबधब्यावर जाण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
नाशिक (प्रतिनिधी): पुढील तीन दिवस जिल्ह्यातील घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
त्यामुळे पावसाचा हाय अलर्ट जेव्हा असेल आणि दर शनिवार, रविवारी दुगारवाडी धबधब्यासह हरिहर किल्ल्यावर जाण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाऱी डी. गंगाथरन यांनी दिला आहे.
तशा सूचना तहसीलदारांना आणि वनविभागासह पोलीसांनाही दिल्या आहेत.
उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
पुढील तीन दिवस घाट माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.. बंदी असतानाही पर्यटक आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, सेल्फी काढणाऱ्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे.
रविवारच्या सुट्टीच्या दिवशी (दि. ७ ऑगस्ट) त्र्यंबकेश्वर परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यास गेलेले २३ तरुण दुगारवाडी धबधबा परिसरात अडकले होते. मध्यरात्री बचाव मोहीम राबवत २२ तरुणांना वाचविण्यात यश आले होते. अशा घटना टाळण्यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहे.