नाशिक: हप्ता दिला नाही म्हणून शालिमार भागात डोसा विक्रेत्याची ओमनी कार जाळली

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: हप्ता दिला नाही म्हणून शालिमार भागात डोसा विक्रेत्याची ओमनी कार जाळली

नाशिक (प्रतिनिधी): दररोज दोनशे रुपयांची खंडणी देण्यास नकार देणार्‍या डोसा विक्रेत्याची ओमनी कार व इतर साहित्य जाळून आर्थिक नुकसान करणार्‍या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी दीपक संजय कपिले (रा. टकले वाडा, रविवार पेठ, नाशिक) हे नेहरू गार्डनजवळ इडली डोसा विक्रीचा व्यवसाय करतात.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

दरम्यान, संशयित आरोपी घार्‍या (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हा कपिले यांच्याकडे काल आला. इडली व डोसा विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी दररोज दोनशे रुपये द्यावेत, अशी मागणी केली; मात्र फिर्यादी कपिले यांनी पैसे देण्यास नकार दिला.

याचा राग मनात धरून आरोपी घार्‍या याने कपिले यांचे आर्थिक नुकसान व्हावे, या उद्देशाने फिर्यादी यांनी जिमखाना येथील पे अ‍ॅण्ड पार्क येथे उभी करून ठेवलेल्या एमएच 15 एएस 1338 या क्रमांकाच्या इडली व डोसा विक्रीच्या ओमनी कारला आग लावली. या कारमध्ये फिर्यादी यांनी ठेवलेल्या 20 प्लास्टिकच्या खुर्च्या व गॅस शेगडी असे साहित्य जाळून आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपी घार्‍याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित सोनवणे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790