नाशिक: सोशल मीडियावर ओळख; धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक: सोशल मीडियावर ओळख; धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर ओळख करून तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील 'या' जिल्ह्यात पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट

या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एक अल्पवयीन ब्लॅक आणि एका युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाय या प्रकरणी संशयित हेमंत भगवान शिरोडे याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीशी सोशल मीडियावर जुलै २०२१ मध्ये अल्पवयीन ब्बाळक व संशयित आरोपी हेमंत शिरोडे (वय: २४, पाथर्डी गाव) यांची ओळख झाली. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली.

🔎 हे वाचलं का?:  पेट्रोल-डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - मंत्री गिरीश महाजन

त्यानंतर पीडितेला तिच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत जुलै २०२१ ते जानेवारी २०२३ या दरम्यान संशयिताने शहरातील वेगवेगळ्या लॉजवर नेऊन त्यांनी पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790