नाशिक: सुनेचा संपत्तीवर डोळा; सासू सासऱ्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न

नाशिक: सुनेचा संपत्तीवर डोळा; सासू सासऱ्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी): कौटुंबिक वादातून सासू-सासऱ्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनेसह तिघांविरुद् खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

या घटनेस अनैतिक संबंधांचीही किनार असून सूनेने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचा प्रयत्न केला तसेच नवऱ्यालाही विष देवून ठार मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता सुनील भिसे (शिवाजीनगर, सातपूर), जिजाबाई गुंजाळ (नवले कॉलनी, नाशिकरोड), संजयकुमार पंढरीनाथ पाटील (रुम क्रमांक ३, विश्वासनगर, अशोकनगर, सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

सुनील भिमराव भिसे (वय ४४, रा. सुनील फोटो स्टुडिओ, शिवाजीनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लता हिने वेगळे रहाण्यासाठी वारंवार भांडणे करून शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाण केली.

त्यासाठी जिजाबाई गुंजाळ हिने मदत केली. लता व संजयकुमार पाटील यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर सुनील भिसे यांनी पत्नीला समजावून सांगितले. तरीही संबंध कायम ठेवून फसवणूक केली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: एटीएममध्ये कार्ड लॉक झाल्याचा गैरफायदा घेऊन कार्ड काढून १ लाखांची फसवणूक

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10193,10183,10181″]

तिघा संशयितांनी संगनमताने संपत्तीवर डोळा ठेवून सुनील भिसे यांच्या आई-वडिलांना विष देवून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लता हिने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लता हिने जिजाबाई गुंजाळ यांना फोन करून विष मागवून घेतले व सुनील यांना देवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यासाठी जिजाबाई गुंजाळ व संजयकुमार पाटील यांनी फूस लावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीन्वये तिघांविरुद्ध भादंवि कायदा कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ४९७, १०९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक शेंडकर तपास करत आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here