नाशिक (प्रतिनिधी): तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांना पोलीस लावून देतो व सोन्याचे दागिने चकाचक करून देतो असे सांगून दोन अज्ञात भामट्यांनी एका महिलेचे तब्बल दोन लाख रुपये किंमतीचे आठ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार भरदिवसा घडला असून याप्रकरणी दोन अज्ञात भामट्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…
नाशिक: वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल
याबाबत अधिक माहिती अशी की, शितल अनिल छत्रिय राहणार हनुमंतानगर, लोखंडे मळा, जुना सायखेडा रोड जेलरोड नाशिकरोड ही महिला घरी असताना दोन अज्ञात संशयित आले व आम्ही सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून चकाचक करून देतो असे सांगून क्षत्रिय यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून शितल छत्रिय यांनी घरातील आठ तोळे वजनाचे व सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने त्या दोन संशयितांकडे दिले.
नाशिकमधील कामगार नेत्याच्या मुलाचा विदेशात इमारती वरून पडून दुर्दैवी मृत्यू
त्यानंतर या दोन भामट्यांनी क्षत्रिय यांची नजर चुकवून सदरचे दागिने लंपास करून तिथून फरार झाले. या घटनेनंतर सदर महिलेने ही घटना आपल्या घरच्यांना व आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली. त्यानंतर या चोरट्यांचा शोध घेण्यात आला परंतु चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.
दरम्यान, या घटनेप्रकरणी शितल छत्रिय यांनी उपनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली असून याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बटुळे हे करत आहेत.