नाशिक शहरासह जिल्ह्यात H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा शिरकाव, काळजी घेण्याचं आवाहन

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरासह जिल्ह्यात H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा शिरकाव, काळजी घेण्याचं आवाहन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर आणि जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत असतानाच ‘एच3एन2 या इन्फ्लूएंझा विषाणूचाही नाशिक शहरात शिरकाव झाला आहे.

महापालिकेने शहरातील खासगी लॅबमधील स्वाइन फ्लूच्या रुग्णाचे अहवाल तपासल्यानंतर त्यात ‘एच3एन2 ‘चेही चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका आरोग्य प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्यासह घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या महिनाभरापासून राज्यासह देशभरात सर्दी-खोकल्याचे रुग्ण झपाट्याने वाढत असून कोरोनासारखी लक्षणे दिसत असल्याने राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा ॲलर्ट झाली आहे. पहिला रुग्ण फेब्रुवारीत आढळला होता. आता चौथा रूग्ण सिडकोत सापडला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

या चारही रुग्णांची प्रकृती चांगली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे. करोनाचा संसर्ग कमी होत नाही, तोच सध्या या विषाणूचे रुग्ण आढळत आहेत. हवामानातही बदल घडत असल्याने रुणांची संख्या वाढत आहे. ही बाब विचारात घेऊन शासकीय आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

दरम्यान ‘एच3एन2 या विषाणूशी दोन हात करण्यासाठी आरोग्य विभागाने नाशिक महापालिकेला अलर्ट जारी केला आहे. या रुग्णांच्या तपासणीसाठी मोहीम सुरू करण्याचेही निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात या विषाणूच्या रुग्णांचा शोध सुरू केला आहे. ‘एच3एन2 या विषाणूची आणि स्वाइन फ्लूची लक्षणे सारखीच असल्याने वैद्यकीय विभागाने 01 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यत शहरात आढळून आलेल्या स्वाईन फ्लूच्या 17 रुग्णांच्या नमुन्यांची फेर तपासणी केली. त्यात शहरात ‘एच3एन2 या विषाणूचे चार रुग्ण आढळून आले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

काळजी घेण्याचे आवाहन:
नाशिक शहरात ‘एच3एन2 विषाणूसोबतच कोविडचे रुग्ण आढळून येत असल्याने या दोन्ही विषाणूंचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे. सोमवारी एकाच दिवशी शहरात सहा रुग्ण आढळले होते. त्या पाठोपाठ आता मंगळवारीदेखील कोविडचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रिय रुग्णाची संख्या 17 वर पोहचली आहे. यातील एका रुग्णावर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ग्रामीण भागातही मंगळवारी दोन कोरोनाबाधित आढळून आले. परिणामी आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 30  झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोविडबाबतही पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

….अशी आहेत लक्षणे:
सर्दी, ताप, खोकला लक्षणे आहेत. विशेष आणि स्वाइन फ्लूची लक्षणे आहेत. त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे दिसताय. डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू करावेत असे आया महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरात ‘एच3एन2’ या विषाणूचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे घाबरून जाण्यासारखे नाही. या चारही रुग्णांची प्रकृती उत्तम आहे. नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत असे आवाहन महापालिका वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790