नाशिक शहरात मंगळवारी (दि. ११ जानेवारी २०२२) कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. ११ जानेवारी) एकूण १४५० कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १०३८, नाशिक ग्रामीण: ३५०, मालेगाव: १४, तर जिल्हा बाह्य: ४८ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७६५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण ४६९ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: फूड डिलिव्हरी करणाऱ्याची इसमाची आत्महत्या
धक्कादायक: नाशिकला तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न, काका-पुतणीचा प्रतिकार
नाशिक: ‘सॉरी मला माफ करा’ अशी चिठ्ठी सोडून चोराकडून चोरीचा मुद्देमाल परत!