नाशिक: शहरात नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई

रोशन गव्हाणे, नाशिक
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर त्रिमूर्ती चौकात कारवाई करण्यात येत आहे.
अनेक रिक्षाचालक बँच,लायन्स,गणवेश याचे नियम मोडून प्रवासी वाहतूक करत आहेत, अशी तक्रार वाहतूक पोलिसांना प्राप्त होत होती.
त्यामुळे यावर कारवाई करणे आवश्यक होते.
त्या अनुषंगाने त्रिमूर्ती चौक आणि अंबड एमआयडीसी या भागात आता कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे.
या कारवाई दरम्यान मागील काही दंड प्रलंबित असेल तर तो सुद्धा वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे अवैध पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना चांगलाचा चाप बसला आहे. विविध ठिकाणी रिक्षाचालकांवर कडक कारवाई केली जात आहे.
प्रत्येक रिक्षाचालकाने बँच, लायसन्स बाळगणे, गणवेश परिधान करणे हे नियम पाळले पाहिजेत. आतापर्यंत रिक्षा चालकांवर केलेल्या कारवाईत ८७,००० रूपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईत युनिट -३ पाथर्डी फाटा नाशिक, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ खिंडे, भामरे, पो.हवालदार राजू गवळी,विजय जिरे,बापु महाजण,संजय भदाणे यांनी सहभाग घेतला