नाशिक शहरातील हेल्मेटसक्ती बाबत अतिशय महत्वाची अपडेट..
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलिसांनी १५ ऑगस्टपासून शहरात दुचाकीचालकाला हेल्मेटसक्ती लागू केल्यानंतर अपघातातील मृत्यूंचे प्रमाण काहीसे कमी झाले असले तरी २९ जणांचे मृत्यूही झाले आहेत.
विनाहेल्मेट असलेल्या आठ हजार ३६४ जणांचे प्रबोधन करूनही हेल्मेटसक्तीचे पुरेसे पालन होत नसल्याने पोलिसांनी आता नवीन वर्षात दुचाकीवरील दोन्ही जणांना हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे.
येत्या १८ जानेवारी २०२२ पासून दुचाकीचालक व पाठीमागील व्यक्तीस हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9431,9436,9439″]
हेल्मेट नसल्यास संबंधितांना दोन तास समुपदेशन, परीक्षा देणे बंधनकारक असेल. नाशिक शहर पोलिसांनी १५ ऑगस्टपासून शहरात हेल्मेटसक्ती लागू केल्यानंतर हेल्मेट वापराचे प्रमाण वाढू लागले, तरी २९ जणांचे मृत्यू झाले आहेत. प्रबोधनानंतरही हेल्मेटसक्तीचे पालन होत नसल्याने पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी ९ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबरदरम्यान पाच हजार ४७५, तर एकट्या डिसेंबरमध्ये दोन हजार ८७९ याप्रमाणे आठ हजार ३६४ जण विनाहेल्मेट सापडले. संबंधित वाहनधारकांचे पोलिसांनी समुपदेशन केले, पण वाहनधारक हेल्मेट वापराबाबत गंभीर नसल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी हा निर्णय घेतला.
परीक्षा अन् एक हजार दंड:
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार १८ जानेवारीपासून शहरात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना हेल्मेट बंधनकारक आहे. शहरात १५ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत ३१ अपघातांमध्ये २४ दुचाकीस्वार पुरुष व पाच महिलांचा मृत्यू झाला आहे. १ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरअखेरपर्यंत सात हजार ३८५ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांना दोन तास समुपदेशन, परीक्षा व हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.