नाशिक: शहरातील मध्यवर्ती भागात डोक्याला पिस्तुल लावत २५ किलो चांदीची लूट

नाशिक: शहरातील मध्यवर्ती भागात डोक्याला पिस्तुल लावत २५ किलो चांदीची लूट

नाशिक शहरातील सर्वात मध्यवर्ती भाग असणाऱ्या आणि आजूबाजूने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांनी घेरलेल्या परिसरात तब्बल २५ किलो चांदीची धाडसी लूट झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

रविवारी (दि. २१) रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून चांदीने भरलेली बॅग घेऊन जाणाऱ्या कुरिअर कर्मचाऱ्यांची दुचाकी अडवून पाच जणांच्या टोळीने पिस्तूलचा धाक दाखवत हा डल्ला मारला.

अमितसिंग सिकरवार (रा. फावडे लेन, मूळ रा. रायबाग, आग्रा) हे जय बजरंग कुरिअरमध्ये नोकरी करतात.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रकाश लोंढे टोळीवर अखेर मकोकाची कारवाई

सराफ बाजारातील व्यावसायिकांकडून चांदी असलेले पार्सल करून रात्री ११.३० वाजता ते पार्सल पुणे, औरंगाबादला पाठविण्यासाठी एमएच १२ टीएफ ७५ वरून राज शर्मा व विष्णू सिसोदिया जुने सीबीएसमार्गे जात असताना किशोर सुधारालयाच्या समोर मागून दोन दुचाकींवरून आलेल्या पाच जणांनी गाडी अडवली.

फिर्यादींच्या डोक्याला पिस्तुल लावले. त्यामुळे घाबरलेले राज शर्मा आणि विष्णू सिसोदिया पळून गेले. पाच जणांनी स्वत:चे वाहन तेथेच सोडत फिर्यादीची दुचाकी घेऊन पोबारा केला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक महापालिकेची अतिक्रमणाविरुद्ध मोहीम आजपासून पुन्हा सुरू...

यासंदर्भात सोमवारी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासूनही रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे लागलेले नाहीत.

जय बजरंग कुरिअर कंपनीचे कर्मचारी नेहमीप्रमाणे विविध सराफ व्यावसायिकांकडून जमा केलेली चांदी घेऊन पुण्याकडे जाण्यासाठी जुने सीबीएसकडून ठक्कर बाजार बसस्थानकाकडे आपल्या दुचाकीवरून रविवारी रात्री येत होते. ठक्कर बाजार अवघे १०० मीटरवर राहिले असताना त्यांच्या मागून अचानक दोन दुचाकींवर पाच जण आले आणि त्यांच्यापैकी एकाने कुरिअरवाल्यांच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे कुरिअर कर्मचारी खाली पडताच लुटारूंनी मारहाण करत चांदी भरलेली बॅग हिसकावून घेत पोबारा केला.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

अवघ्या काही मिनिटांत ही धाडसी लूट झाल्याने एकप्रकारे ते पोलिस यंत्रणेलाच आव्हान असल्याची प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. संशयित लुटारूंची दुचाकी एमएच १५ जीएस ५९६६ ही पिंपळगाव येथून चोरी केलेली होती. ती घटनास्थळावरच सोडून फिर्यादीचीच दुचाकी घेऊन लुटारू पळाले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790