नाशिक शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश..

नाशिक शहरातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश..

नाशिक (प्रतिनिधी): शहर पोलिस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले. पंचवटी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी डॉ. सीताराम कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भद्रकाली पोलिस ठाण्याची धुरा संभाजी निंबाळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. नाशिक रोड पोलिस ठाण्यात अनिल शिंदे यांची बदली करण्यात आली आहे.

पोलिस ठाण्याचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित होत्या. पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी मंगळवारी (दि.३१) वरिष्ठ निरीक्षकांची खांदेपालट केली. यात डॉ. सीताराम कोल्हे (मध्यवर्ती गुन्हे शाखा ते पंचवटी), संभाजी निंबाळकर (सहायक आयुक्त ४ ते भद्रकाली), भारतकुमार सूर्यवंशी (वाहतूक ते म्हसरुळ), सुनील जाधव (नियंत्रण ते सरकारवाडा), भगीरथ देशमुख (नियंत्रण कक्ष ते मुंबई नाका),

⚡ हे ही वाचा:  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने दिली ‘ही’ शेवटची तारीख !

रियाज शेख (सरकारवाडा ते गंगापूर), श्रीपाद कुलकर्णी (सायबर पोलिस ठाणे ते इंदिरानगर), नीलेश माईनकर (इंदिरानगर ते उपनगर), विजय ढमाळ (मुंबई नाका ते गुन्हे शाखा युनिट १), आनंदा वाघ ( गुन्हे शाखा युनिट १ ते युनिट २), कुंदन जाधव (उपनगर ते मध्यवर्ती गुन्हे शाखा), अंचल मुदगल (गंगापूर ते मध्यवर्ती गुन्हे शाखा), सूरज बिजली ( नाशिक रोड ते सायबर पोलिस ठाणे), महेंद्र चव्हाण (पोलिस कल्याण ते सायबर पोलिस ठाणे), हेमंत सोमवंशी (सरकारवाडा ते दहशतवाद विरोधी पथक),

⚡ हे ही वाचा:  नाशिक: मोटारसायकल स्लिप होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू

संजय सांगळे (प्रशिक्षण शाखा), साजन सोनवणे (भद्रकाली ते वाहतूक शाखा), आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख, सातपूर पोलिस ठाण्याचे किशोर मोरे, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याचे कमलाकर जाधव, अंबड पोलिस ठाण्याचे कुमार चौधरी यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. याचबरोबर प्रथमच वाहतूक शाखेला १० पोलिस निरीक्षक निरीक्षक देण्यात आले आहेत.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here