नाशिक: वीस वर्षीय तरुणाचा भर रस्त्यात खून; तीन तासांत आरोपीला अटक

नाशिक: वीस वर्षीय तरुणाचा भर रस्त्यात खून; तीन तासांत आरोपीला अटक

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून 20 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे.

या घटनेने काही दिवसांपासून शांत असलेले नाशिक शहर पुन्हा एकदा हादरले आहे.

 नाशिकच्या पंचवटी परिसरात ही घटना घडली असून पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

शनिवारी (दि. १० सप्टेंबर २०२२) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास रवी महादू शिंदे उर्फ रवी सलीम उर्फ पिंटू सैयद (वय: २०, रा: गल्ली नं. ३, मायको दवाखान्याच्या मागे, कालिका नगर, पंचवटी) हा घरी पायी जात असतांना संशयित किरण रमेश कोकाटे हा रिक्षाने पाठीमागून येऊन त्याने मयतावर धारदार शास्त्राने हल्ला केला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

दरम्यान रात्रीची वेळ असल्याची संधी साधत कोकाटे याने घटनास्थळावरून पळ काढला. रवीच्या वर्मी घाव बसल्याने आणि रक्तस्त्राव अधिक झाल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात रात्रभर तणावाचे होते. रवीच्या खुनाबाबत युसुफ अमीर सैयद यांनी किरण रमेश कोकाटे याच्याविरुध्द दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

👉 हे ही वाचा:  पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करणार

दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड गंगाधर सोनवणे, सहा.पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग यांनी सदर घटनास्थळी भेट दिली. तसेच संशयित आरोपीचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करण्याचे सूचना दिल्या होत्या. त्यानंतर घटनास्थळी वपोनि विजय ढमाळ, वपोनी आंचल मुदगल यांनी भेट देत तपास सुरू केला.

त्यानुसार पंचवटी विभागातील पंचवटी, म्हसरूळ, आडगाव येथील गुन्हे शोध पथकाच्या वेगवेगळ्या तीन टीम बनवून संशयित किरण कोकाटे याचा शोध पथके तयार करून रवाना करण्यात आली होती. त्याप्रमाणे पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून संशयित किरण कोकाटे याला सिडको, अंबड नाशिक येथून ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं रवि याचा खून केल्याची कबुली दिली आहे.पोलिस पुढील तपास करत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिकला पावसाची थोडी उसंत; घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी 'यलो अलर्ट' जारी

जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याच्या पुढील तपासाकरीता न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेतले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित नलवडे हे करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790