नाशिक: वीजपुरवठा खंडित केल्याने वीज कर्मचार्‍यास मारहाण

नाशिक: वीजपुरवठा खंडित केल्याने वीज कर्मचार्‍यास मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): थकित वीज बिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्याचा राग आल्याने दोघा जणांनी कर्मचार्‍यास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सचिन एकनाथ लिटे (वय 41) हे वीज कर्मचारी आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

ते काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जुने नाशिकमधील दरबार रोडवर राहणारे संशयित आरोपी अजय पवार व लखन पवार यांच्या घराजवळ आले.

“तुम्ही थकित लाईटबिल भरले आहे का,” अशी विचारपूस लिटे याने केली असता लाईटबिल भरले नाही म्हणून पवार यांच्या घरातील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

त्यानंतर लिटे हे परत निघून जात असताना अजय पवार व लखन पवार यांनी पाठीमागून दगड फेकून लोखंडी सळईने लिटे यांना मारहाण केली, तसेच हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790