नाशिक विभागातून 42 हजार 708 विद्यार्थ्यांनी दिली राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा

नाशिक विभागातून 42 हजार 708 विद्यार्थ्यांनी दिली राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): आज (दि. ४ सप्टेंबर) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. या परिक्षेसाठी नाशिक विभागातून 64 हजार 421 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील 42 हजार 708 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. तसेच 21 हजार 703 विद्यार्थी परीक्षेसाठी गैरहजर होते. नाशिक विभागातील  185  परीक्षा उपकेंद्रावर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा घेण्यात आली होती . या परीक्षेसाठी विभागातून 5 हजार 636 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नाशिक जिल्ह्यातून 14 हजार 932 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:
नाशिक जिल्ह्यातून एकूण 22 हजार 419 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 58 केंद्रावर 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 7 हजार 487 विद्यार्थी गैरहजर होते. या परीक्षेसाठी 1 हजार 900 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अहमदनगर जिल्ह्यातून 12 हजार 549 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:
अहमदनगर जिल्ह्यातून एकूण 19 हजार 147 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 60 केंद्रावर 12 हजार 549 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 6 हजार 598 विद्यार्थी गैरहजर होते. या परीक्षेसाठी 1 हजार 702  अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

धुळे जिल्ह्यातून 5 हजार 242 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:
धुळे जिल्ह्यातून एकूण 7 हजार 749 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 23 केंद्रावर 5 हजार 242 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 2 हजार 497  विद्यार्थी गैरहजर होते. या परीक्षेसाठी 550 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

जळगांव जिल्ह्यातून 7 हजार 540 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:
जळगांव जिल्ह्यातून एकूण 11 हजार 463 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 35 केंद्रावर 7 हजार 540 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 3 हजार 923  विद्यार्थी गैरहजर होते. या परीक्षेसाठी 1 हजार 130  अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

नंदुरबार जिल्ह्यातून 2 हजार 445 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:
नंदुरबार जिल्ह्यातून एकूण 3 हजार 643 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 09 केंद्रावर 2 हजार 445 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर असून 1 हजार 198  विद्यार्थी गैरहजर होते. या परीक्षेसाठी 354  अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790