नाशिक: वटपौर्णिमेलाच विवाहितेने ग ळ फा स घेत संपविली जीवनयात्रा; पतीला अटक

नाशिक: वटपौर्णिमेलाच विवाहितेने ग ळ फा स घेत संपविली जीवनयात्रा; पतीला अटक

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या शनिवारी शहरभर सुवासिनी वटसावित्री पौर्णिमा साजरी करीत असताना, जेलरोड परिसरातील २९ वर्षीय विवाहितेने दुपारी राहत्या घरात झोळीच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केल्याची घटना घडली.

मयत विवाहितेने सासरच्यांकडे असलेली सोन्याची पोत पूजेला जाण्यापूर्वी मागितली असता, त्यावरून वाद झाला.

त्यानंतर काही वेळातच विवाहितेने गळफास घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पतीला अटक करण्यात आली आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन; तीन लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

भाग्यश्री गोकुळ बोडके (२९, रा. त्रिमूर्ती नगर, राजराजेश्‍वरजवळ, जेलरोड) असे मयत विवाहितेचे नाव आहे. गोकुळ वसंत बोडके (पती), छायाबाई (सासू), वसंत बोडके (सासरे, सर्व रा. राजराजेश्वरी मंगल कार्यालयामागे, त्रिमूर्तीनगर, जेलरोड) या संशयितांविरोधात नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत भाग्यश्रीचा भाऊ विजय सानप (रा. करजगाव, ता. चाळीसगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गोकुळ व भाग्यश्री यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पती गोकुळ मेडिकल चालक असून, गेल्या दीड वर्षांपासून त्याचे एका महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे भाग्यश्रीला कळाले होते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: खंडणीच्या गुन्ह्यात ९ महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितास अटक !

त्यावरून त्यांच्यात वाद होत होता. तसेच माहेरुन चार लाख रुपये आणावेत म्हणून सासरच्यांकडून तिचा छळही केला जात होता. याबाबत तिने आई-वडिलांनाही कळविले होते. महिन्याभरापूर्वी त्या माहेरी करजगावी गेल्या होत्या. कुटुंबियांनी समजूत घातल्यानंतर त्या आठ दिवसांपूर्वीच सासरी आल्या होत्या.

दरम्यान, गेल्या शनिवारी (ता. ३) वटसावित्री पौर्णिमेसाठी पूजेची तयारी केली. तर, दोन ते तीन वर्षांपासून भाग्यश्री यांची चार तोळ्याचे मंगळसूत्र तिच्या सासरच्यांकडे होते. पूजेला जायचे असल्याने ते मंगळसूत्र सासरच्यांकडे मागितले असता, त्यावरून घरात वाद झाला.

त्यानंतर भाग्यश्री यांनी दुपारी राहत्या घरात झोळीच्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटना लक्षात येताच पतीने बिटको रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत- डॉ. प्रवीण गेडाम

तर, माहेरच्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल करुन संशयितांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव वाढला होता.

जिल्हा रुग्णालयात शवविच्छेन करण्यात आले. याप्रकरणी सासरच्यांविरोधात शारीरिक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मध्यरात्री दाखल झाला. मृत भाग्यश्रीच्या पश्चात एक मुलगा असून तपास उपनिरीक्षक जी. एम. काकड करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790

here