नाशिक: लग्न लावून देण्यावरून मुलगा आणि बापात तुंबळ हाणामारी; मुलाचा मृत्यू

नाशिक: लग्न लावून देण्यावरून मुलगा आणि बापात हाणामारी; मुलाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): लग्न लावून देण्यावरून मुलगा आणि बापात तुंबळ हाणामारी झाली. यात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे.

तर वडील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

चांदवड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, चांदवड तालुक्यातील नारायण खेडे येथे कारभारी रावबा ठोके (वय: ६०) हे त्यांच्या परिवारासोबत राहतात.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी मोठा मुलगा प्रकाश, सून, दोन नातवंड आणि लहान मुलगा रवींद्र एकत्र रहात.. घराजवळ असलेली शेती करून ते उदरनिर्वाह करत आहेत. मोठ्या मुलाचं लग्न झाल्यांनतर वडिलांना लहान मुलगा रवींद्र याचं लग्न करायचं होतं… मात्र त्याला दारू पिण्याचं व्यसन असल्यानं त्याचं लग्न होत नव्हतं… वडिलांनी सुद्धा त्याला “अगोदर दारू सोड मग तुझं लग्न लावून देतो असं सांगितलं होतं… मात्र याचा राग लहान मुलगा रवींद्र याच्या मनात होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: कंटेनरवर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात तरूण ठार

२४ जुलै २०२२ ला सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सगळे शेतात काम करत होते. आणि वडील कारभारी ठोके हे घरात झोपले होते. यावेळी रवींद्र याने वडिलांना लग्न करून देण्याबाबत पुन्हा विचारण केली, मात्र वडिलांनी नकार दिल्याने रवींद्र याने वडिलांना शिवीगाळ केली. आणि जवळच असलेली लोखंडी पहार घेऊन वडिलांच्या डोक्यात मारून डोके फोडून दुखापत केली. यानंतर वडिलांनी लोखंडी पाईपने आणि पहारीने मुलाच्या डोक्यावर आणि हातापायावर जबर मारहाण केली. यात रवींद्र याचा मृत्यू झाला. तर वडील कारभारी ठोके यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790