नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून सात वर्षे बलात्कार; ॲट्रॉसिटीन्वये गुन्हा दाखल
नाशिक (प्रतिनिधी): प्रेमसंबंधानंतर लग्नाचे आमिष दाखवून संशयिताने तब्बल सात वर्षे पीडितेवर अत्याचार केले.
मात्र “तू खालच्या जातीची आहे” असे तिला वारंवार हिणवून लग्नास नकार देणाऱ्या संशयितासह तिघांविरोधात बलात्कार व ॲट्रोसिटी अन्वये नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल गुलाब भावसार, मीना भावसार, गुलाब भावसार (सर्व रा. गुरुदर्शन अपार्टमेंटसमोर, मॉडेल कॉलनी, जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत.
पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०१४ पासून पीडित महिला व संशयित निखिल यांच्या प्रेमसंबंध होते. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या घरी, शिर्डी व त्याच्या राहत्या घरी नेऊन शारीरिक संबंध ठेवले. मात्र नंतर त्याने पीडिता खालच्या जातीची असल्याने लग्नास नकार दिला.
- नाशिक: उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात बुलेटस्वार मित्रांपैकी एकाचा मृत्यू; एक जखमी
- Ad: नाशिकला इथे मिळतेय अस्सल काळ्या मसाल्याचे मटण व भाकरी !
तसेच, पीडितेच्या आईवडीलांनाही त्याने खालच्या जातीच्या असल्यावरून बऱ्याचदा हिणवले. संशयितावर असलेल्या प्रेमामुळे तो आपल्याशी लग्न करेल अशी पीडितेला आशा होती. परंतु संशयिताने नकारच दिल्यामुळे पीडितेने नाशिकरोड पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक आयुक्त धुमाळ हे तपास करीत आहेत.