
नाशिक: रात्री जेवणानंतर मित्रांसोबत शतपावली करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे.
नाशिकच्या म्हसरूळ परिसरी ही घटना घडली असून अज्ञात वाहनचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल बाळकृष्ण भालेराव वय ६१, (रा. मोहिनीराज बंगलो, दिंडोरी रोड म्हसरूळ) हे हे रात्री १०:३० वाजेच्या सुमारास त्यांचे मित्र नानासाहेब कचरू रुकारे व प्रकाश कारभारी सुर्यवंशी यांच्यासह जेवण आटपून बाहेर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले होते.
रात्री म्हसरूळ गावाकडुन साईबाबा मंदिराकडे पायी जात होते. रात्री 10.30 वाजेच्या सुमारास मानस बंगल्यासमोर पाठी मागुन भरधाव वेगाने एक अज्ञात चारचाकी वाहन आले.
- नाशिक: ओ मामीsss; मामी म्हटलं म्हणून राग आला, ग्राहकाची केली धुलाई!
- नाशिक: अल्पवयीन मुलींचे विवस्त्र फोटो पॉर्न साईटवर व्हायरल करणाऱ्यास सक्तमजुरी
- नाशिकला वृत्तपत्रविक्रेत्याच्या घरावर दगडफेक
वाहन चालकाने रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव वेगात चालवत नेत असतांना अनिल बाळकृष्ण भालेराव आणि त्यांचे मित्र नानासाहेब कचरू रूकारे यांना मागून धडक दिली. या धडकेत अनिल भालेराव यांचा मृत्यू झाला तर नानासाहेब रुकारे हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर गाडी चालक फरार झाला आहे. शुभम अनिल भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार म्हसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. के. माळी करत आहेत
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790