नाशिक: या पठठ्याने जमिनीत पुरले होते काडतूस व कट्टा…
नाशिक (प्रतिनिधी): गावठी कट्टा बाळगणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने शिवाजीनगर येथे ही कारवाई केली. आशिष सुनीलदत्त महिरे (रा. निगळ पार्क, पुष्पकोटी बंगला, शिवाजीनगर, सातपूर) असे या संशयिताचे नाव आहे. संशयिताने गावठी कट्टा आणि ३ जिवंत काडतूस विकत घेत प्लास्टिकच्या पिशवीत ठेवत ड्रेनेज चेंबरच्या बाजूला खड्डा करून पुरून ठेवल्याचे निदर्शनास आले. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पथकाचे प्रवीण वाघमारे यांना एका तरुणाने बेकायदेशीर गावटी कट्टा विकत घेतला असल्याची माहिती मिळाली होती.
या अधारे पथकाने संशयितावर पाळत ठेवत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेत कसून चौकशी केली असता संशयिताने गावठी कट्टा आणि तीन जिवंत काडतूस विकत घेतल्याची कबुली दिली. पथकाने जमिनीत पुरून ठेवलेला कट्टा आणि काडतूस जप्त केले. वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ, रघुनाथ शेगर, काशीनाथ बेंडकुळे, प्रवीण चव्हाण, मनोज डोंगरे, महेश साळुंके, गौरव खांडरे, समाधान पवार यांच्या पथकाने उपआयुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.संशयिताने फरार सराईत गुन्हेगाराकडून कट्टा विकत घेतल्याची कबुली दिली.