Video: मोकाट कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी
नाशिक (प्रतिनिधी): मोकाट कुत्र्यांचा सूळसूळाट शहरात मोठ्या प्रामाणात वाढला आहे.
आता लहान मुलांसह मोठी माणसे देखील अशा कुत्र्यांना बिचकून राहताना दिसत आहेत.
तरी अशा कुत्र्यांचा उच्छाद काही केल्या कमी होताना दिसत नाहीय.
सिन्नरमधील अशाच एका 10 वर्षीय मुलावर शिकवणीसाठी जात असताना पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला चढवल्याची घटना घडली.
नाशिकच्या सिन्नरमध्ये मोकाट कुत्र्यांचा एका लहान मुलावर हल्ला, मुलगा गंभीर जखमी तर घटना सीसीटीव्हीत कैद… pic.twitter.com/QjhjQkqDGY
— Nashik Calling (@NashikCalling) May 17, 2022
कुणाल अरविंद भांडगे (10 वर्षे) रा. विठ्ठलेश्वर मंदिराजवळ, शिंपी गल्ली हा मुलगा सोमवारी दुपारी सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या बेसमेंट मधून सांगळे कॉम्प्लेक्स येथे शिकवणीसाठी जात असताना वाचनालयाच्या बेसमेंट मध्ये पाच ते सहा कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला.
- नाशिक : पत्नीची हत्या करून पसार झालेल्या पतीनेही स्व:तास पेटवून घेत केली आत्महत्या
- नाशिक: बाप आणि मुलाचं भांडण… “या” कारणामुळे बापानेच केला मुलाचा खून…
- नाशिक: मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या
आवाज ऐकून वाचनालयाच्या अभ्यासिकेतून विद्यार्थी व नागरिक मदतीला धावून गेले. त्यांनी कुणालला कुत्र्यांच्या तावडीतून कसेबसे सोडवले. या घटनेत कुणाल याचा मांडी, खांदा व दंडाला कुत्र्यांनी चावे घेतले असून भिंतीवर आदळल्याने त्याच्या डोक्याला देखील जखम झाली आहे.
वाचनालयाच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या खाटीक गल्लीत मांसाचे तुकडे मिळतील या अपेक्षेने असंख्य कुत्रे घोटाळत असतात. त्यातील काही कुत्रे विसाव्याला वाचनालयाच्या बेसमेंटला येऊन बसतात. एकट्याने जाणार येणार यांच्या अंगावर ही कुत्री धावून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कुणाल वर झालेल्या हल्ल्याचा संपूर्ण प्रकार वाचनालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.