नाशिक: मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्ट्या मिळणार का.. प्रशासनाने दिले हे आदेश…

नाशिक: मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्ट्या मिळणार का.. प्रशासनाने दिले हे आदेश…

नाशिक (प्रतिनिधी): कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्याला तीन दिवस रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

पालघर आणि पुणेसह नाशिक जिल्ह्यात ११ ते १४ जुलै 2022 दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे.

👉 हे ही वाचा:  राज्यातील 'या' जिल्ह्यांना आज (दि. १० जुलै) पावसाचा इशारा !

पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे गंगापूर धरणातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला असून, गोदाकाठच्या नागरिकांनी सावध राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्ट्या मिळणार का असा प्रश्न पालकांना पडला आहे.

त्यामुळे “सध्या पावसाचे प्रमाण पाहता, परिस्थिती अशीच असल्यास, परिस्थिती पाहून मुख्याध्यापकांनी शाळेस सुटी देण्याचा निर्णय घ्यावा, सुटी दिल्यास नंतर अभ्यास व शालेय कामकाजाचे दिवस भरुन घेण्याची दक्षता घेण्यात यावी” असे आदेश नाशिकमधील शाळांना महापालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांनी दिले आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

नाशिक शहरासोबत जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पुरपरिस्थीती निर्माण झाली असून नदी- नाल्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790