नाशिक: मुले पळविणारी टोळी समजून ब्लँकेट विक्रेत्यांना बेदम मारहाण

नाशिक: मुले पळविणारी टोळी समजून ब्लँकेट विक्रेत्यांना बेदम मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुलांना पळवून नेणारी टोळी शहरात आली असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे.

अशाच व्हायरल मेसेजवर विश्‍वास ठेवून उपनगर परिसरातील टाकळी भागात ब्लँकेट विक्री करणाऱ्या दोघा फेरीवाल्यांना मुले पळविणाऱ्यांची टोळी समजून नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी घडली.

सुदैवाने पोलिसांनी वेळीच दाखल होत हस्तक्षेप केल्याने दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका झाली.

हे ही वाचा:  नाशिक: शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवून २४ लाखांना गंडा

त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

काही दिवसांपासून सोशल मीडियावर लहान मुले पळवून नेऊन त्यांच्या अवयवांची विक्री वा त्यांचा भीक मागण्यासाठी वापर केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर, काही वर्षांपूर्वी व्हॉटस् अॅपवरील व्हायरल संदेशामुळे मुले पळवणाऱ्यांची टोळी समजून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे पाच निष्पाप नागरिकांची ग्रामस्थांनी ठेचून हत्या केल्याची घटना घडली होती.

दरम्यान, याच घटनेची पुनरावृत्ती नाशिकमध्ये होता होता राहिली. उपनगराच्या टाकळी रोड येथे ब्लँकेट विक्रीसाठी आलेल्या व्यक्तींना लहान मूल पळविणारी टोळी असल्याच्या संशयावरून परिसरातील नागरिकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर काही सुजाण नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघा विक्रेत्यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली.

हे ही वाचा:  नाशिक: पोलिस आयुक्त आपल्या दारी; तक्रारींचे आवाहन

तेव्हा ते खरेखुरे फेरीवाले असल्याचे व नेहमीच ब्लँकेट विकण्यासाठी येत असल्याचे समोर आले. टाकळी परिसरात ब्लँकेट विकताना परिसरातील शंकर मोगल साळवे यांचा लहान मुलाने विक्रेत्याचे ब्लँकेट ओढल्याने विकणाऱ्याने त्याला हटकून रागवत त्याला धरले होते.

हे ही वाचा:  नाशिक मनपाचा पुष्पोत्सव अखेर रद्द

ही घटना परिसरातील नागरिकांनी बघितली व त्यांनी दोघा विक्रेत्यांना मारहाण केली. त्यात दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दोघे संशयित मुले पकडणारे नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790