नाशिक-मुंबई महामार्गावर धारदार शस्त्राचा धाक दाखवुन चालकांना लुटणाऱ्या टोळीला अटक

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाजवळील के.पी.जी.कॉलेजजवळ असलेल्या ओव्हर ब्रिजखाली रात्रीच्या वेळेस वाहनचालक वाहन बाजुला लावुन विश्रांती घेत असतांना त्यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवुन लुटमार करणाऱ्या पाच संशयीतांना पोलीसांनी धारदार शस्त्र, चोरलेले सहा मोबाईल, पल्सर मोटारसायकल मुद्देमालासह अटक केली.

रात्रीच्या वेळेस प्रवाशांचे रूपये व दागीने लुटणारी टोळी अनेक महिन्यापासुन कार्यरत असल्याची चर्चा होती.

त्याची माहीती पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना गुप्त माहितीच्या आधारे मिळताच पोलीस पथक तैनात करून सापळा रचला असता सोमवार ( ता.१० रोजी ) रात्रीच्या सुमारास वाहन धारकांना शस्त्राचा धाक दाखवुन लुटमार करण्याच्या तयारीत असलेली टोळी पैकी एक संशयीताला पोलीसांनी रंगेहात पकडले असता त्याच्याकडे एक कोयता, तलवार व धारदार शस्त्रे मिळुन आली.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

बाकी टोळकी जंगल भागात पळुन गेली मात्र पोलीसी खाक्या दाखविताच पळालेल्या सर्व संशयीत आरोपीची मोबाईल नंबर, नावे, फोटो व माहीती मिळताच मंगळवार ( ता.११ रोजी ) पोलीसांनी पाच संशयीत आरोपी जेरबंद केले.पो.हवा.सचिन देसले यांनी तक्रारवरून त्यांच्या विरूध्द लुटमार करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पोलीस ठाणे किंवा मदतकार्य कुठे आहे याची माहिती नसल्याने अनेक वाहनचालक व प्रवासी घटना झाल्यावर निघुन जातात याचाच फायद्या घेत या टोळकीने अनेक महिन्यापासुन लुटमारी, दरोडा या सारख्या कामाला व्यवसाय व उत्पन्नाचे साधन केले होते.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

मात्र पोलीस ठाण्यात एक कार्यक्षम अधिकारी म्हणुन पोलीसी खाक्या दाखविणारे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांची नियुक्ती झाल्याने शहर व परिसरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे .

अनेक गुन्हयांची उकल करून कायदा व सुव्यवस्था राखल्याने नागरीक हि सहकार्य करीत पोलीस मित्र झाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळते.लुटमार , दरोडा घालणारी टोळीला जेरबंद केलेल्या संशयीत आरोपी अल्पवयीन करण बाळकृष्ण डावखर व गणेश अशोक राक्षे, मयुर मोतीराम भगत, सुरज सुरेश जगताप,

रोहित गोरख म्हसणे, प्रथमेश पोपट मानवेढे सर्व रा. गिरणारे. या पाच संशयीत आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर करणार असुन कसाराघाट ते टाके घोटी हद्दित महामार्ग व परिसरात होणारी लुटमार, दरोडा आदि गुन्हयातील आणखी काही गुन्हेगार मिळुन येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

या घटनेचा तपास पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधिक्षक माधुरी कांगणे, पोलीस उपअधिक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे, पोलीस कर्मचारी सचिन देसले, मुकेश महिरे, विजय रूद्रे, निलेश देवराज, अभिजित पोटींदे, आबासाहेब भगरे, सचिन मुकणे, एस.एस.जाधव, पो.हवा.साळवे पथक करीत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790