नाशिककरांसाठी महत्वाची बातमी! ‘लाइफलाईन’ झालेली सिटीलिंक बससेवा ठप्प

नाशिककरांसाठी महत्वाची बातमी! ‘लाइफलाईन’ झालेली सिटीलिंक बससेवा ठप्प

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधून महत्वाची बातमी समोर येत आहे. 100 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं असून नाशिक महानगरपालिकेची सिटीलिंक बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: शेवटच्या घटकांपर्यंत जलदगतीने सेवा पोहोचवा - जिल्हाधिकारी जलज शर्मा

तीन महिन्यांपासून पगार होत नसल्यामुळं कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं आहे. पहाटेपासूनच तपोवनमध्ये असलेल्या बस डेपोतून एकही गाडी रस्त्यावर धावणार नाही, असा कर्मचाऱ्यांनी पवित्राच घेतला आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: बसस्थानकात दागिने चोरणारे बंटी-बबली जाळ्यात

मात्र, अचानक बससेवा बंद झाल्यामुळं प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. सध्या प्रवासी मिळेल त्या वाहनाने आपला पुढचा प्रवास करत आहेत, परंतु त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. या आंदोलनाचा मोठा फटका नाशिक महानगरपालिकेला बसणार आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790