नाशिक: मित्राच्या पत्नीला जाळणाऱ्या आरोपीला आजन्म कारावास
नाशिक (प्रतिनिधी): मित्राच्या घरात वास्तव्य करत असतांना त्याच्या पत्नीने दुसरीकडे राहण्यास सांगितल्याच्या रागातून तिला रॉकेल टाकून पेटवून जीवंत जाळल्याप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा न्यालयाने सुनावली.
रवींद्र नाना भामरे (३९) असे या आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ३१) जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती एम. व्ही. भाटीया यांन ही शिक्षा ठोठवली.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०१९ रोजी सकाळी ७ वाजता कृष्णनगर येथे आरोपी रवींद्र भामरे हा १३ वर्षापासून बाळू मोरे यांच्यासोबत राहत होता.
मयत रेखा बाळू मोरे (४०) यांनी रवींद्र यास दुसरीकडे भाड्याने राहण्यास सांगीतले. यातून दोघांमध्ये वाद झाले. या रागातून संशयिताने रेखा यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याने पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक निरीक्षक एम. एस. शिंदे यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले होते. परिस्थीतीजन्य पुराव्यास अनुसरुन खुनाच्या गुन्ह्यात आजान्म कारावासाची शिक्षा त्याला न्यायालयाने ठोठावली आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
दुर्दैवी: पैसे हरवले म्हणून २२ वर्षीय तरुणीची नाशिकला आत्महत्या…
नाशिक: गर्दी नियमांचे उल्लंघन केल्यास लॉन्स, मंगल कार्यालय सील करणार
नाशिक: मुलीचा अश्लील व्हिडिओ तयार करून 10 लाखांची खंडणी मागणारे दोघे गजाआड