नाशिक: महिला सुरक्षा विभागात समुपदेशनासाठी आलेल्या मायलेकींनी पोलिसांनाच केली मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): समुपदेशनासाठी आलेल्या मायलेकींनी महिला पोलिसांना बोचकारून मारहाण घटना समोर आली आहे.
नाशिकच्या महिला सुरक्षा विभागात हा प्रकार घडला.
समुपदेशन सुरू असताना दोन महिलांनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीसासह तिच्या सहकारी कर्मचार्याला मारहाण केली.
याबाबत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10313,10311,10306″]
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी ज्योती तुकाराम आमणे (वय 43) या व त्यांची सहकारी महिला पोलीस गंगापूर रोडवरील महिला सुरक्षा विभाग येथे शासकीय कर्तव्य करीत होते. त्यावेळी आरोपी प्राजक्ता योगेश नागरगोजे (वय 24, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) व श्रीमती सरला बोडके (पत्ता माहीत नाही) यांनी समुपदेशन सुरू असताना आमने व त्यांच्या सहकारी पोलीस महिलेला शिवीगाळ केली, तसेच नखाने हातावर ओरखडे ओढून जखमी केले, तसेच बोडके यांनी आमणे यांच्यावर हल्ला करून पाठीवर जोराने मारहाण करून जखमी केले, तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.
दरम्यान या प्रकरणी नागरगोजे व बोडके या दोन महिलांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये करीत आहेत.